चहा…

मला आठवतं त्यानुसार मी थोडी मोठी झाल्यावर माझी ह्या पेयाशी ओळख झाली. बघत होते आधीपासून पण ओळख नंतरची आणि
ती झाल्यावर शाळेत असेपर्यंत हा मला फक्तं माझ्या वाढदिवसाला भेटायचा, इतर वेळेस नाव घ्यायची पण मला परवानगी नव्हती. त्यामुळे मग मला वाढदिवसाची वाट बघायला अजून एक कारण मिळायचं.  मोठ्यांना जसा दिला जातो तसा मिळणारा हा चहा… तेव्हा कधी कळालं नाही की ह्यात एवढं विशेष काय आहे…

हळू हळू तो दर रविवारी मिळायला लागला, मग रोज सकाळी आणि नंतर मग त्याचं प्रमाण दिवसातून ४ वेळा असं कधी झालं हे काही मला आठवत नाही पण एकंदरीतच तो प्रवास सुखकर असावा… आणि मग वाटायचं एवढ्या सुंदर पेयापासून मला आईनी इतकी वर्ष लांब का ठेवलं? पण जाऊदे म्हणा तो backlog मी एव्हाना भरून काढलाच असेल…
हा कधी प्यावा कसा प्यावा ह्याला काही नियम नाही. सकाळी उठल्यावर, न्याहारी नंतर, दुपारच्या जेवणानंतर, घड्याळात ४ वाजले म्हणून, संध्याकाळी डोकं दुखतंय म्हणून किंवा रात्री गप्पा रंगल्या आणि हुक्की आली म्हणून… २ चहाबाज लोकं भेटली म्हणजे मैत्री झालीच म्हणून समजायचं…
पुण्यामध्ये कितीतरी लोकं रात्रभर जागून अभ्यास(!) करतात आणि मग ३ वाजले की काय आठवतं तर ‘जवळचं अमृततुल्य उघडलं असेल आता, चला एक चक्कर टाकून येऊ’. मग ते अमृततुल्य कुठचं, ते मागून उघडलेलं असतं का पुढून ह्याची इत्थंभूत माहिती ह्या चहाबाजांना असते… मला पण माहित आहे तसं, नाही नाही म्हणणार मी… 😛

a-cup-of-tea-makes-everything-better-quote-1एक शब्द ऐकीवात आला tepidophobia म्हणजे काय तर वाईट चहा ची भीती… पण हे अगदी खरं आहे… ह्याचं महत्त्व चहा प्यायचा म्हणून पिणाऱ्या लोकांना कधीच नाही कळणार… तो कधीही प्यायला तरी अमृत पीत आहोत असा समज करून घेण्यातच त्याची खरी मजा आहे. उगच नाही ह्याला आम्ही पृथ्वीवरचं अमृत म्हणत… मग भले तो पिऊन acidity झाली तरी चालेल पण आम्ही तो सोडणार नाही… 🙂
ह्या चहाची नं एक अनोखी गम्मत आहे, कधीकधी पूर्ण दिवस कसा जाईल ह्याचा निर्णय हा कपातला चहा घेतो. दिवसाची सुरुवातच जर वाईट चहानी झाली तर सगळा उत्साहच मावळून जातो. एक तरतरी आणणारा चहा ह्याहून अधिक सुखावह गोष्ट नाही…
आकाशात ढग दाटून आले आणि पावसाचा शिडकावा चालू झाला तर ह्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि अशावेळी आल्यावाचून ह्याला काही मजा पण नाही… मित्रांसोबत गाडीवर मारलेली पावसातली चक्कर आणि रस्त्यावरच्या एका टपरीवर भिजलेल्या अवस्थेत प्यायलेला गरम, वाफाळता, आल्याचा चहा… ह्या सारखं दुसरं स्वर्गसुख नाही…

आता हे सगळं मला चहा बनवताना सुचलं हे विशेष सांगायची गरज नाही. आणि आता एवढं लिहिताना मी त्याचा आस्वाद घेत होते हे पण त्या ओघानी आलंच…
– तुमच्यासारखीच एक चहाबाज, अनन्या

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s