अचानक जमलेला उत्तम बेत…

नोकरी करते त्या दिवसापासून मला शुक्रवारी संध्याकाळी काम करायचा जाम कंटाळा येतो… समोर कितीही काम दिसत असलं तरी एक आळस आलेला असतो. त्या दिवशी पण असच झालं… समोर काम होतं आणि मी घड्याळाकडे बघत बसले होते आणि इतक्यात ईशान चा फोन,
“कुठे आहेस?”
“office”
“नाटकाला येत आहेस?”
“कुठचं आणि कुठे?”
“यशवंतराव ला. हा शेखर खोसला कोण आहे?”
“ohh… कलाकार कोण आहेत?”
“मधुरा वेलणकर, लोकेश गुप्ते, तुषार दळवी, शर्वरी…”
पुढची नावं त्यानी घ्यायच्या आधीच मी त्याला येते असं सांगून टाकलं आणि वेळेच्या अर्धा तास आधी आमची स्वारी इच्छित स्थळी पोचली. नाटक चालू होईला बराच वेळ होता. सरळ backstage ला शिरलो हातात कॅमेरा घेऊन. प्रत्येक खोली मधे डोकावत, आत कोण आहे ह्याचा कानोसा घेत आम्ही चालत होतो आणि एक दार उघडं दिसलं. आत डोकावलं तर तुषार दळवी आणि लोकेश गुप्ते मस्त आवरून तयार होते. आमच्या विनंतीखातर एक फोटो पण काढला. नाटक करताना जी काही उर्जा लागते नं ती सळसळून वाहत होती प्रत्येक कलाकारामधून. इतक्यात एक दार उघडलं आणि मधुरा ताई बाहेर आली. जरा गडबडीतच होती. आम्ही फोटोचं विचारल्यावर मागे आली, पटकन एक फोटो काढला आणि परत मंचावर गेली…
एकदम अनपेक्षित पद्धतीने नाटकाला सुरुवात झाली… नावावरून नाटक रहस्यमयी वाटत होतं आणि चला हवा येऊ द्या मधे ऐकलं पण हेच होतं. पण तरीही समोर काय चालू आहे ह्याचं गणित सुटत नव्हतं… अभिनयाला दिलेल्या अतिशय वेगळ्या आणि सुरेख छटा खरोखरंच नजर खिळवून ठेवणाऱ्या होत्या. आपल्या आजूबाजूलाच घडणारा एक किस्सा, त्यात किंचितसा टाकलेला अतिशयोक्ती चा अलंकार, कलाकारांचा सहजसुंदर अभिनय, खुसखुशीत संवाद आणि ह्या सगळ्यामध्ये काठोकाठ बुडालेला प्रेक्षकवर्ग… सगळं एकदम फर्मास जमून आलं होतं… आणि अचानक एक twist आणि त्यानंतर संपूर्ण कथेला मिळालेली एक वेगळीच कलाटणी… तिथेच खरंतर मन जिंकलेलं संपूर्ण team नी.
एका रहस्यमयी कथेचा आस्वाद घ्यायला मी आले होते पण जाताना मला बऱ्याच काही गोष्टी मिळाल्या होत्या…
उत्कृष्ट कथानक, प्रकाशझोताचा सर्वोत्तम वापर, संवादाला आणि परिस्थितीला चपलख बसणारं संगीत आणि ह्या सगळ्या गोष्टींना बांधणारा, प्रत्येक व्यक्तिरेखेला त्या रंगमंचावर जिवंत करणारा कलाकारांचा कोरीव अभिनय… कोरीव ह्या साठी म्हणेन की त्यांच्यातला प्रत्येक जण छोट्यात छोट्या गोष्टीची पण दखल घेत होता…
योग्य समयी झालेला मध्यंतर खरोखरंच विचार करायला लावणारा होता. का झालं असं? कोण आहे तो? ह्यांना कसा भेटला? असे असंख्य प्रश्न मनात गुंजारव करत होते… दुसऱ्या अंकात प्रत्येक प्रश्नाची हळूहळू उत्तरं मिळत गेली. पुढे काय होणार ह्याचा अंदाज लावायचा माझा खेळ इथे पण चालू होता आणि मी बऱ्याचदा चुकले… हिच ह्या नाटकाची जादू आहे… तुम्ही विचार करत रहा, निरनिराळे अंदाज लावा आणि कथा दरवेळेस तुम्हाला चुकीचं ठरवेल पण त्याचबरोबर खिळवून पण ठेवेल…
खूप दिवसांनी नाटक बघायचा योग आला होता त्यामुळे अपेक्षा निश्चितच खूप होत्या. नाव, दिग्दर्शक, कलाकार बघून त्या अजून जास्तं उंचावल्या होत्या. नाटक संपेपर्यंत त्या पूर्ण तर झाल्याच पण त्याहूनही खूप जास्तं समाधान मला मिळालं होतं आणि ते म्हणजे एक उत्तम नाटक बघितल्याचं समाधान…
तुम्ही अजून बघितलं नसेल तर अवश्य बघा असा एकदम typical निरोप मी तुम्हाला देणार नाही पण हो एवढा नक्की सांगेन की तुम्हाला जर कथा, संगीत, अभिनय, नेपथ्य, दिग्दर्शन ह्या सगळ्याचा एकत्रितपणे मनमुराद आस्वाद घ्यायचा असेल तर हा बेत नक्की जमवा…
– नाटक प्रिय, अनन्याNew Ima=

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s