पत्रास कारण की…

तळेगावच्या घरात त्या छोट्याश्या, अंधाऱ्या जिन्याखालच्या खोलीत दिवसभर धुडगूस घालताना कधी वाटलं पण नव्हतं की आज एवढं सगळं बदललेलं असेल. भर मे महिन्यातले सुट्टीचे चे दिवस, चांडाळ चौकडी आणि त्यांचा दंगा… हेच सगळं आठवतं…

IMG-20151001-WA0013त्याच चांडाळ चौकडी मधलं गोंडस शेंडेफळ. जो लहानपणापासून सैनिक होण्याचं स्वप्न बघत होता. प्रत्ये
कवेळी खेळताना हा आपला सैनिक. दिवाळीत आणलेली बंदूक असायचीच ह्याच्याकडे कायम. अगदीच काही नाही सापडलं तर जे दिसेल त्याला बंदूक बनवून हा छोटा शिपाई सीमेवर लढायला जायचा. तेव्हा वाटायचं हा खरंच सैनिक होईल आणि जाईल निघून एक दिवस सीमेवर… स्वप्नं त्याचं होतं पण त्यानी मला पण ते बघायला भाग पाडलं…

हा आमचा छोटा शिपाई लहानपणी जिथे जाईल तिथे चपला सोडून यायचा आणि मग ह्याची दोस्त मंडळी कधीतरी द्यायचे आणून नाहीतर महाराज दुसऱ्या दिवशी घेऊन यायचे… हे फक्तं चापलांच्याच बाबतीत मर्यादित नव्हतं तर कधीतरी सायकल पण कुठेतरी भलतीकडेच असायची… तेव्हापासूनच हा छोटा शिपाई माझा मित्र बनला. आधी रात्री जागून गप्पा मारणं वगरे प्रकार माहित नव्हतं हळूहळू ते माहित होत गेले आणि मग आमची जागरणाची सत्र चालू झाली. रसनाची बाटली आणि गप्पा. ह्यातच कधीकधी पत्ते…

एकत्र कधीही जमलो की गप्पा हा नेमच बनला… त्या गप्पांमध्ये कितीतरी गुपितं सांगितली गेली आणि स्वप्नांचे मनोरे बांधले गेले… पुढे काय होणार, आपण कुठे असणार हा विचार पण कधीच मनात आला नव्हता फक्तं एक माहित होतं जिथे कुठे असू एकत्र असू आणि हे गृहीत धरूनच पुढचा आराखडा आमचा तयार होत होता…

OLYMPUS DIGITAL CAMERA
The text is incomplete without this image…

६वी मधे असताना आमचा छोटा शिपाई पुण्यात आला आणि मैत्री अजून फुलत गेली… काही करायला नसलं की लगेच घर
गाठायचं आणि दंगा चालू… मी पण तेव्हा शाळेतच होते पण सायकलवर भर उन्हात तिकडे जायला कधीच नकोसं वाटायचं नाही… काहीही छान झालं किंवा वाईट झालं की एकमेकांना सांगायचं ही सवयच लागली… गरज पडेल तेव्हा लहान कोण मोठं कोण हे विसरून एकमेकांची कान उघडणी करायला पण कधी मागे पुढे पाहिलं नाही… नंतर तर कधीतरी फोन होयचे, “मला बोलायचय. मी राहायला येत आहे. रात्री बोलू”… कधी मी वक्ता असायचे तर कधी तो…

एकएक टप्पा गाठत शिपाई मोठा झाला आणि स्वप्न हळूहळू बदलायला लागलं. सीमारेषेवर लढायला जाणारा माझा संकु, ती ओलांडून शिक्षणासाठी बाहेर जायचं स्वप्नं बघायला लागला होता… सगळं एकदम पटापट बदलायला लागलं… GRE चा अभ्यास करताना, bag भरायची वेळ कधी येऊन ठेपली कळालं पण नाही… एकदम भुर्रकन सगळं होऊन गेलं…

२ ऑगस्ट २०१४ ला आमचं शेंडेफळ पुढचा पल्ला गाठण्यासाठी पुण्याहून निघालं… जाताना पण वाटत होतं, लहानपणी जाईल तिथे चपला विसरणारा हा तिकडे इतक्या लांब जाऊन कसं करेल सगळं? मुंबई ला सोडायला गेले तेव्हा डोळे तर पाणावले होते पण त्याचा विचार करून मनाला तिथेच आवर घातला होता… नाही म्हणायला एक कविता केली होती जी आता कुठेच सापडत नाही… लहान असल्यापासून अर्चू ताई अर्चू ताई म्हणत मागे फिरणारं पिल्लू, खूप मोठी झेप घेत होतं… आणि त्यानी ती यशस्वीरीत्या घेतली…

आमच्या सगळ्यांच्या चिंता मिटवत त्यानी उत्तुंग भरारी घेतली… एक भीती होती मनात की थोडं अंतर वाढेल पण त्या धैर्यवान पिल्लानी ती शंका पण पुसून टाकली. “मला बोलायचय मी घरी येत आहे” ची जागा आता “मला बोलायचय, weekendला skype वर भेटू” नी घेतली… आणि सगळं जसच्या तसं राहिलं…

तुझा walk बघायची प्रचंड इच्छा होती पण काम आलं आणि राहून 13221047_1066442510087759_6324783490283231686_nगेलं… खूप वाईट वाटत होतं पण त्याहूनही जास्तं तुझ्या
यशाबद्दल अभिमान वाटत होता… graduation चा तो cape आणि hat बघितली आणि लई भारी वाटलं एकदम… साडेतेवीस वर्षांची सोबत, त्यात घालवलेल्या अगणिक आठवणी, घरच्यांचा मार खायची वेळ येईपर्यंत केलेले किस्से, १२ वी ला मी तुझी केलेली कान उघाडणी, त्यानंतर तू मला केलेलं promise सगळं डोळ्यासमोरून निघून गेलं… इतके दिवस एकदम छोटुसा वाटणारा तू अचानक मोठा झालास…

मला आत्ता काय वाटत आहे हे तुझ्यापेक्षा जास्तं चांगलं कोणी नाही ओळखू शकणार… आणि खरतर ते सांगायला आज शब्द पण माझी मदत नाही करू शकणार… असाच पुढे जात रहा, नवीन पल्ले गाठत रहा… ही ताई कायम तुझ्यासोबत आहे…

तुझी,
अर्चू ताई

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s