कथा कुरळ्या केसांची

थंडगार वाऱ्याच्या झोतावर स्वार होऊन आज मी तिच्याबरोबर गावभर भटकत होतो. तिच्या मैत्रिणींचा घोळका तिला दिसला आणि तिनी गाडी थांबवली. lock लाऊन, माझ्या अंगावरून हात फिरवला आणि ती चालायला लागली. मैत्रिणींनी तिच्याकडे बघून वेगळीच reaction दिली आणि क्षणभर मी धसका घेतला. कारण समोरून अशी काही reaction मिळाली की तिचा response काय असणार हे एव्हाना मला पाठ झालं होतं.
“अगं काय हा तुझा अवतार? अशी येणारेस आमच्या बरोबर?”, तिच्या मैत्रिणीनी विचारलं आणि तिच्या सोबत असणाऱ्या माझ्या मित्रानीपण मला हिणवलं.
“बघ नं. राग येतो मला ह्यांचा”, चेहरा पाडत तिनी उत्तर दिलं आणि पुढच्या वाक्यासाठी मी माझे कान बंद करून घेतले…
“I hate my hair”
गळया शप्पथ सांगतो आत्ता पर्यंत इतक्या वेळा ऐकलं आहे हे वाक्य पण तरीही परत कानावर पडलं की ती आग मुळापर्यंत जाते. असं वाटत हिच्या गळ्याभोवती फेर घेऊन विचारावं,
“गाडीवरून फिरताना स्कार्फ बांधू नको असं मी सांगितलं होतं का तुला? स्वतःला मोकळा वारा आवडतो म्हणून मला पण मोकळ्यावर सोडलस आणि त्यामुळे आता माझा अवतार खराब झाला तर परत मलाच बोलणी? किती वर्षांची संगत आपली? तू जन्माला आलीस तेव्हापासून साथ देतो आहे मी तुला. काहीच कसं वाटत नाही तुला? तुझ्यापेक्षा चांगलं कोणी ओळखत नाही मला तरी पण तुला कळत कसं नाही मला काय आवडतं आणि काय नाही? तुझ्या त्या purse मधे show साठी असलेल्या माझ्या मित्राची गाठ घालून दिली की तुला पण माहित आहे मी लगेच कसा नॉर्मल ला येतो ते? मग तरी पण उगच चिडचिड का करत असतेस माझ्यावर?

तू लहान होतीस नं तेच चांगलं होतं. आई मला तेलानी मालिश करायची, माझ्या निगराणी साठी किती कष्ट घ्यायची. ३ पेडाचा तो सुंदर गोफ गुंफायची. तुला मात्र तेव्हा पण कौतुक नव्हतं बहुतेक माझं. दरवेळेस आपलं मला कमी करायलाच टपलेली असायचीस तू. तरी पण मी कायम साथ द्यायचो तुला. मला वाटत होतं मोठी झाल्यावर तुला समजेल माझी किंमत आणि तू स्वतः काळजी घ्यायला लागशील माझी. पण चित्र ह्याच्या अगदीच उलट झालं.
तेलाचा सहवास आता मला फक्तं तुझं डोकं दुखायला लागलं की मिळतो. ते पण दुसऱ्या दिवशी रविवार असेल तरच, नाहीतर तुला लाज वाटते आम्हाला दोघांना सोबत घेऊन फिरायला. ३ पेडाचा सुंदर तर सोड पण साधा गोफ पण येत नाही आता. तुझ्या त्या fashionable stepcut नी माझ्या कटकटी वाढवल्या आहेत. कुठचेतरी ते उग्र वासाचे shampoo आणि त्यानंतर तो conditioner, श्वास पण नाही घेऊ देत तू नीट.
३-४ दिवसातून एकदा मला धुतल्यावर तुला लगेच बाहेर जायचं असतं मग काय dryer च्या त्या गरम वाफा अंगावर घ्याव्या लागतात मला आणि तुझ्यासाठी मी ते निमुटपणे सहन करतो. पण मी काय म्हणतो, तुला माहित आहे नं dryer मला झेपत नाही मग का वापरतेस? लवकर उठ की कधीतरी आणि मला पण जरा वेळ देत जा गं माझ्यावरचे पाण्याचे तुषार दूर करायला.

आजकाल तर नवीन खूळ लागलंय तुला, त्या metal च्या २ गरम पट्ट्यांमध्ये मला घालतेस, मला चटके देतेस आणि माझं मुळात असलेलं रूप पूर्ण घालवून टाकतेस. का तर चांगलं दिसतं म्हणून. मला चटका देताना कधीतरी तुला पण लागतोच नं? कळत असेल तुला तेव्हा मला काय होत असेल ते. पण चांगलं दिसायला म्हणून तू तो चटका सहन करतेस आणि तुला माझ्यामुळे २ दिवस का होईना आनंद मिळतो म्हणून मी पण ते चटके आनंदानी सहन करतो.  मान्य आहे मला कधी कधी माझं आणि त्या कंगव्याचं हितगुज चालू होतं आणि मग तो बाहेर येत नाही. पण म्हणून मला चटके देणं हा काही उपाय नाही नं!

त्यादिवशी तर तू कहरच केलास… राग आलेला तुझा खूप… कंटाळा आला म्हणून तू मला रंगवून टाकलस? एवढा पण काही वाईट रंग नाहीये गं माझा. ५० मिनिटं तो अमोनिया वाला रंग माझ्या अंगावर ठेवला होतास. काय तो वास, काय तो रंग. ६ दिवस झाले तरी पण येत होता मला तो वास. मीच हैराण झालो होतो त्यानी. तुला कसं काहीनाही वाटलं? का वाटत होतं, पण तू नेहमी सारखं दुर्लक्ष केलस? रंगवायला गेलीस तेव्हा सगळे माझं कौतुक करत होते आणि तुला सांगत होते नको असं काहीतरी करूस पण तरी तू तुझा हट्ट पूर्ण केलासच…

आता काय अजून नवीन वाढून ठेवलं आहेस तू माझ्यासमोर please मला जरा आधी सांग. म्हणजे मला मानसिक तयारी करायला बरी.

पण मला नं एक कोडं सुटत नाही… तुझ्या बऱ्याच मैत्रिणी माझं कौतुक सांगतात तुला तेव्हा तर छान हसत असतेस, वर तोंड करून सांगतेस पण की कुरळे असल्याचा फायदा काय असतो ते… ‘पाहिजे तशी hairstyle करता येते, मोकळे सोडले तरी छान दिसतात, clutch लाऊन पण एक वेगळा लूक येतो, कुठचाही haircut नी लूक खुलून येतो.. आणि बरंच काही.’ मग माझ्याशी अशी का वागतेस? कधीतरी काळजी घेत जा नं माझी मनापासून, शाळेत असताना घ्यायचीस तशी.”

बरंच बोललो नं. काय करू खूप दिवस मनात होतं. आलं एकदम बाहेर.

माझं हे बोलणं चालू असताना तिनी माझी कंगव्याशी गाठ घालून दिली हे कळालंcurly-hair पण नाही मला. आत्ता एकदम आरशात बघितलं तेव्हा जाणवलं ३ पेडाचा गोफ नाही पण छान गुंफलं होतं तिनी मला. तिच्या अजून २ मैत्रिणी आल्या होत्या आणि तिला सांगत होत्या किती छान दिसत आहेत केस. आज कापलेस का?

चेहऱ्यावर मस्त हसू आणत तिनी नाही असं उत्तर दिलं आणि प्रेमानी माझ्या अंगावरून हात फिरवला.गळया शप्पथ सांगतो इतकं छान वाटलं नं आणि क्षणार्धात मगाशी मी काय बोललो ते मी विसरलो होतो. तिच्यासोबत परत त्या मोकळ्या वाऱ्यावर स्वार होण्यासाठी मी तयार झालो होतो…

-कुरळ्या केसांची अनन्या

Advertisements

One thought on “कथा कुरळ्या केसांची

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s