मला दिसलेली मुंबई

मुंबई विषयी लिहायला तसं मी बराच उशीर करत आहे. तिच्यापासून वेगळं होऊन मला आता जवळपास ८ महिने झाले. मुंबई-पुणे प्रवासा दरम्यान एक डायरी असायची माझ्याकडे आणि बऱ्याचदा train मधे बसल्या बसल्या तिच्या पानांवर माझी नक्षी चालू रहायची. डायरी विषयी लिहायचं कारण असं की त्यात मी “मुंबई नी मला काय दिलं?” हे सविस्तर लिहिलं होतं. पण आता ती डायरी सापडत नाही आणि मी त्यात नक्की काय लिहिलेलं ते मला आठवत नाही. पण तेव्हा जे लिहिलेलं ते नक्कीच चांगलं होतं कारण तेव्हा मुंबईवरचं माझं प्रेम ताजं होतं.
आत्ताच स्पष्ट सांगते, मला मुंबई आवडली म्हणजे माझं पुण्यावरचं प्रेम कमी झालं आहे असं काही नाहीये.

10980719_10153661922986029_2722137300976237496_nसुरुवातीचे काही दिवस त्या दमट हवेत माझी घुसमट होत होती. पुण्यात सहजासहजी सापडणारा मोकळा वारा तिथे कुठेच नव्हता. आणि माझी गाडी पण नव्हती जिला घेऊन मी मोकळा वारा शोधला असता. पण पुढच्या काहीच दिवसांत अतिशय मोहक रुपात तो मला भेटला, मरीन drive वर. अस्ताला जाणारा तो मनमोहक तांबूस सूर्य, त्याच्या त्या मंद प्रकाशात चमकणारा संथ समुद्र आणि दगडांची अतिशय कलात्मकतेने रचलेली माळ…
तोच क्षण होता जेव्हा मी मुंबईच्या प्रेमात पडले. त्या मोकळ्या वाऱ्याशी मनसोक्त गप्पा मारत मी पहाटे पर्यंत तिथेच बसले होते. मग कोणीतरी चहा विकायला येऊन गेलं, चणेवाला येऊन गेला. कोणीतरी गिटार घेऊन बसलेलं, कोणी त्या मोकळ्या जागेत कसरती करून दाखवत होतं, रात्री ३ वाजता पण ती जागा जागी होती…

त्या दरम्यान माझी राहायची जागा तात्पुरती बदलली आणि लोकल चा रोजचा २ तासाचा प्रवास माझ्या नशिबात आला. भर गर्दीच्या वेळात मी मोठी bag घेऊन लेडीज डब्ब्यात शिरलेले आणि मग पुढची जवळपास १५ मिनिटं माझ्या नावाचा उद्धार चालू होता, गर्दीच्या वेळी मोठी bag घेऊन गाडीत शिरले म्हणून. माझ्यातला पुणेरी शिष्टपणा जागा ठेवत मला काहीही फरक पडत नाहीये असा आव मी आणला आणि गाणी ऐकत बसले (बसले म्हणजे उभी राहिले. मुंबईच्या लोकल मधे गर्दीच्या वेळी बसायला मिळणे म्हणजे चितळ्यांनी दुपारी दुकान उघडं ठेवण्यासारखं आहे). वाद लवकर संपवायचा असेल तर आपण गप्प राहावं ही शिकवण मला त्या लेडीज डब्ब्यामधल्या भांडकुदळ बायकांनी दिली. २ तासाच्या प्रवासामुळे ऑफिसला पोचायची आणि तिथून निघायची वेळ fix झाली. कारण जरा जरी उशीर झाला तरी लोकल निघून जाणार आणि मग पुढच्या लोकल नी घरी जायला अजून वेळ लागणार.
मुंबई मधे लोकं train मधे शिरली की जागा बुक करून ठेवतात. हे माझ्यासाठी जरा जास्तंच नवीन होतं. सुरुवातीला मी कोणालाही नं विचारता उभीच राहायचे, नशिबात असेल तर जागा मिळेल असा विचार करत. पण एकदा एका आज्जीनी उतरायच्या आधी मला स्वतःहून सांगितलं, “मी उतरत आहे तू बसून घे इकडे”. काय गरज होती त्या आज्जीला? तिचा चेहरा अजून पण चांगला लक्षात आहे माझ्या.
१-२ वेळा मी ती लोकल अक्षरशः पळत येऊन पकडली आहे. गर्दी आत सरकेपर्यंत दारात लटकले. त्यावेळी मी बाहेर लटकत असताना एका बाईनी हात माझ्या मागून घेऊन मधला बार पकडला होता, मी पडू नये म्हणून… ही दुसरी वेळ होती, मी तिच्या प्रेमात पडायची. पुण्यात अतिशय मुश्किलिनी सापडणारी अनोळखी लोकांसाठीची माणुसकी तिथे माझ्या ओंजळीत अगदी सहज आली होती. त्या क्षणी मला एक आत्मविश्वास मिळाला होता की मी ह्या मुंबई मधे एकटी फिरू शकते.

माझं office, मी जिथे राहायचे ते ठिकाण, पुण्याला जाताना आणि येताना लागणारं station सगळं central line वर होतं. त्या line वर कल्याण पासून VT पर्यंत माझा प्रवास करून झाला होता. पण माझ्यातली उद्योगी मुलगी तेवढ्यावर खुश नव्हती, मित्रमैत्रिणींना भेटायला मी हार्बर line चं नेरूळ बघून आले, आणि वेस्टर्न वरचं गोरेगाव. जीवघेण्या गर्दी मधे शिरले, चुकून एक station आधी दारात जाऊन उभी राहिले (मुंबई मधे हा घोर अपराध आहे), लोकल पकडताना पडले पण मी मुंबई जगले आणि त्या मुंबईकरासारखं जगण्याचा प्रयत्न पण केला.

मुंबई मेट्रो बद्दल खूप क्रेझ होती मनात पण तिकडे जायला कोणी सोबत नव्हती सापडत खूप दिवस. मग काय, केला प्लान मीच आणि गेले. घाटकोपर पर्यंत central line मग अंधेरी पर्यंत मेट्रो आणि मग परत मालाड पर्यंत वेस्टर्न. खूप विचित्र आणि दमवणारा प्रवास होता. पण तो माझा मुंबई मधला सगळ्यात जास्तं स्मरणीय प्रवास होता. (त्याचं वर्णन केल्यावर मला खूप लोकं ओरडली पण की एकटी का फिरलीस एवढी, रिक्षा नी जायचं, कॅब करायची). ते म्हणतात नं “when in Rome, do as the Romans do” and yes that’s what I did. मुंबईमधले हेच आणि असेच काही दिवस मला खूप आत्मविश्वास देऊन गेले.

मुंबई मधे गर्दी खूप आहे पण गोंधळ नाही. तुम्ही त्या गर्दीमध्ये त्यांच्याप्रमाणे वागा आणि मग तुम्हाला त्याचा त्रास कधीच नाही होणार उलट ती गर्दी तुम्हाला मुंबई जगायला शिकवेल. त्या गर्दीमध्ये china made फोन वापरणाऱ्यांपासून iPhone मिरवणाऱ्यांपर्यंत सगळे एकसाथ असतात, तिथे भेद नसतो. मुंबई मधला प्रत्येक जण खरंच घड्याळाच्या काट्यानुसार धावतो. तुम्ही म्हणता मुंबई जगत नाही, फक्तं राबते. असं असेल तरी तुम्ही तिला कधी जवळून बघितलंच नाही. मला जी मुंबई भेटली ती राबते पण आणि रात्री वेळ काढून जगते पण. मुंबई कडे अफाट वेग आहे. त्याचं आणि तुमचं जर जमलं नाही तर तुम्हाला ती कधीच आवडणार नाही. आरामात घरातून निघून, आरामात office ला पोहोचणाऱ्यांसाठी ती मुंबई बनलीच नाहीये. आणि जर तुमचं त्या वेगाशी जमलं, तर मुंबई मधे रहाणं तुमच्यासाठी संस्मरणीय होऊन जाईल ह्यात काही वाद नाही.

मुंबईची सगळ्यात जास्तं भावलेली गोष्ट म्हणजे, कधीही नं थांबायची तिची जिद्द. २००५ मधे ती मुसळधार पावसाला बळी
10978600_10153666623986029_8062371529774973080_n.jpgपडली, लोकं २-३ दिवस पुरेशा अन्नाशिवाय तसेच राहिले, जे मिळेल त्याचा आसरा केला आणि त्या प्रसंगाला तोंड दिलं. पुरात वाहून गेलेली ती काहीच दिवसांत परत त्या मुसळधार सरी सहन करायला उभी राहिली होती. २००८ मध्ये कसाब आणि त्याच्या टोळीनी तिच्या चिंधड्या उडवल्या पण ती परत आधीच्याच दिमाखात उभी राहिली. तिच्यातली ती लढवय्या वृत्ती तिला कधीच खचू देत नाही, तिचा हाच गुणधर्म त्या मातीत रहाणाऱ्या प्रत्येकामध्ये आहे. आणि त्यांच्या ह्या ultimate spiritला माझा मनापासून सलाम.

एक पुणेकर असून पण मुंबई चं एवढं कौतुक मी करत आहे, पण काय करू आहेच ती मुंबई अशी scotch सारखी… ज्यांना जमली ते प्रेमात पडले, ज्यांना नाही जमली ते परत फिरले…

“ए दिल है मुश्किल जीना यहाँ,
जरा हट के जरा बच के
ये है बम्बई मेरी जान ”

 

– मुंबई च्या प्रेमात पडलेली पुणेरी अनन्या

10996160_10153662066741029_8009533631856232064_n

 

Advertisements

2 thoughts on “मला दिसलेली मुंबई

 1. मुबंईत राहिल्यावर मुंबई तुम्हाला जिंकते, तिथे सिद्धिविनायकाच्या वरदहस्त आहे, हाजीअलीची नेमत आहे, दादर पारल्यात सापडणारं थोडंसं पुणं आहे, धावती लोकल आहे, शांत समुद्र आहे, जुहूतली संध्याकाळ आहे, फोर्टची दुपार आहे. लालबागचा राजा आहे, बॉलिवूडचा गाजावाजा आहे. बडे मियांचे कबाब आहेत , रस्त्यावर राहणारे नवाब आहेत. सब कुछ है मुंबई, भीड के बिचोबीच बडी अपनी है मुंबई

  Ananya, as usual खूप झकास , मला परत मुंबईत पोचवलंस. may the mumbaiyya punekar rock always.

  Like

 2. वाह….अप्रतिम प्रवास वर्णन…..

  तुमच्या पुढील post ची आतुरतेने वाट पाहावी लागेल.

  छोटी छोटी सुद्धा प्रवास वर्णने तुम्ही लिहुन बघावे अशी अपेक्षा , वाचकांना आवडतील.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s