एक असतो राजा…

आपल्या जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत एक व्यक्ती आपल्या सोबत कायम असते, तुमच्या डोक्यात आई आली नं? पण आईबरोबर आई इतकाच महत्वाचा घटक असतो त्याचं काय? ज्याचं नाव लावून आपण स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू बघतो तोच हा बाबा… लोकांनी आईबद्दल आत्तापर्यंत खूप लिहिलं… पण बाबाबद्दल फारसं जमलं नाही कोणाला लिहायला का कोणी प्रयत्न नाही केला? का कोणाला बाबा कधी कळलाच नाही?

संसाराच्या रहाट गाडग्यात तो सुरुवातीपासूनच स्वतःला झोकून देतो. आधी फक्त त्याच्या आईबाबांची काळजी, मग बायकोची आणि मग नंतर मुलांची… वेळ जसा पुढे जातो तसं त्याच्यावरच्या जबाबदाऱ्या फक्त वाढतच जातात… घरच्यांच्या सुखापायी तो दिवसरात्र एक करत झगडत राहतो… कधी कोणी विचार केला हे सगळं करताना तो किती त्याग करतो?

Fathers-dayमुलाच्या जन्माचा आनंद आई इतकाच त्याला पण होतो, पण कामासाठी तो बाहेर पडतो… त्याच्या मुलांच्या त्या निरागस बालविश्वापासून तो सुरुवातीलाच दुरावला जातो… मुलाचं पाहिलं पाऊल, त्याचा पहिला शब्द हे सगळं त्याला पण अनुभवावसं वाटत असेल नं? पण त्याच्या कर्तव्यापायी तो ह्या सगळ्यापासून लांब राहतो आणि एक दिवस अचानक त्याला कळतं की त्याचं पिल्लू चालायला नाही तर भरारी घ्यायला लागलंय… घरासाठी तो राब राब राबतो आणि सगळ्यापासून अलिप्त राहतो… राहतो का राहावं लागतं?

मुलं मोठी होतात, बाबाकडे बघत त्याच्यासारखी स्वप्न बघायला लागतात… संवाद हरवलेला बाबाला दिसत असतं पण तो सगळं निमूट बघण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही… मुलांच्या सुखासाठी झटताना, मोहात अडकायला नको म्हणून तो कदाचित पिल्लांना त्याची सवय पण लागू देत नाही… पण हाच त्या पिल्लासाठी स्वावलंबी होण्याचा पहिला धडा असतो हे कोणाच्याच लक्षात येत नाही… बाबा असतो पण बऱ्याचदा असून नसल्यासारखा असतो असं त्या पिल्लाला सतत वाटत राहतं पण मुळात तसं कधीच नसतं… तो अंधारात पण साथ नं सोडणाऱ्या सावलीसारखा सतत आपल्या पाठीशी असतो… (उगाच नाही भीती वाटल्यावर तोंडातून ‘बाप रे’ निघत! माहित असतं नं बाबा सोबत आहे)

आईला वाईट वाटलं, तिला त्रास झाला ती रडून मोकळी होते! असं बाबाला झालं तर तो काय करत असेल? कधी केला विचार? घरच्यांसाठी खंबीर राहायचं म्हणून तो इतका कणखर होतो की नंतर त्याला खचून जायची पण परवानगी नसते कारण तो खचला तर त्याचं पूर्ण घर खचणार असतं… तो तसाच चालत राहतो, नं थांबता, नं कोलमडता, त्याच्या सोबत चालणाऱ्या सगळ्यांना वाट दाखवत तो पुढे जात राहतो…

बाबाच्या आनंदाची व्याख्या तरी काय असते? अस्ताव्यस्त रेषांतून तयार झालेल्या पिल्लाच्या चित्रात त्याला कौतुक वाटतं… पिल्लाच्या प्रत्येक कृतीत तो एक उज्ज्वल भविष्य बघत राहतो… आईसारखा तो पण खरच स्वतःसाठी जगायला विसरतो… स्वतःसाठी फोन घेतो तो पण पिल्लाला आवडला म्हणून हसत देऊन टाकतो, आवडत असलेला पदार्थ तो पण पिल्लासाठी काढून ठेवतो, दिवाळीला मिळालेला सगळा बोनस तो त्याच्या घरच्यांसाठी देऊन टाकतो… त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच त्याला मिळालेला सर्वोत्तम बोनस असतो… मग तो स्वतःसाठी कधी जगतो?

बाबा, काय असतं नक्की ह्या दोन अक्षरात? त्याच्या परिवाराचा कणा असतो तो… कायम सरळ राहायचं, आणि कोणाला वाकू द्यायचं नाही एवढंच त्याला माहित असतं… आई जर का घराचं छप्पर असेल नं तर बाबा म्हणजे भिंत… ज्याच्याशिवाय ते छप्पर पण नीट नाही राहू शकत… आई पिल्लाला प्रेम शिकवते तर बाबा जगाशी दोन हात करायला शिकवतो, स्पर्धेत टिकायला शिकवतो, कधीही नं खचता स्वप्नं पूर्ण करायचं ध्येय तो स्वतःच्या कृतीतून कायम दाखवून देतो…

father-and-daughterपिल्लू मोठं होतं, वेळ आल्यावर घरटं सोडून निघून जातं, आई कोलमडते पण तो तसाच असतो, निश्चल… पिल्लाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास तो मनाच्या पटलावर बघत राहतो… त्याचं पण काहीतरी निसटून गेलं असतं पण परिस्थिती हसतमुखानी मान्य करत तो आधीसारखाच ताठ राहतो… बाबा खरंच नाही कळला कोणाला, खंबीर राहायचं म्हणून त्यानी कोणालाच त्याच्या मनाचा थांगपत्ता लागू दिला नाही… त्याची लाडकी राजकन्या गेली तरी पण त्याच्या भावना मोकळेपणानी कधीच दाखवता येत नाहीत… सगळे रडत असतात पण तो मात्र एखाद्या पर्वतासारखा सगळ्यांच्या मागे उभा राहतो, नकळत डोळ्यातलं पाणी लपवत…

बाबा म्हणजे घराचा कणा,
बाबा म्हणजे स्वाभिमानी बाणा…
बाबा म्हणजे नं दिसणारी माया,
बाबा म्हणजे अंधारात पण साथ नं सोडणारी छाया…

बाबा म्हणजे कधीच नं विझणारा दिवा,
बाबा म्हणजे घरं जोडणारा दुवा…
बाबा म्हणजे घड्याळाचा नं थांबणारा लोलक,
बाबा म्हणजेच माझी पहिली ओळख…

 

एका प्रेमळ आणि खंबीर राजाची राजकन्या,
अर्चना श्रीकांत कर्णिक833790526-fadf941ce8ca659f2f2af30d16a698c6

Advertisements

3 thoughts on “एक असतो राजा…

  1. Awesome.
    Very nice article and touching.
    I wish you will make proud to your father in times ahead with your beautiful thoughts and same kind of behavior.

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s